मुंबई : रोमान्सचा बादशाह शाहरुख खानचा आज 51 वा वाढदिवस... आपल्या अभिनयानं गेली दोन दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणा-या शाहरुखवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरुन शाहरुखला शुभेच्छा दिल्यात. तसंच बॉलीवुडच्या किंगचा वाढदिवस म्हणजे त्याच्या फॅन्ससाठी जणू आनंदोत्सव असतो. त्यामुळं आपल्या लाडक्या अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी फॅन्स शाहरुखच्या मन्नत या घराबाहेर मोठी गर्दी करतात.


यंदाही शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी फॅन्स मोठ्या संख्येनं मंगळवारी रात्री मन्नतबाहेर जमा झाले होते. मात्र शाहरुखनं यंदा रात्री मन्नतवर वाढदिवस साजरा न केल्याने फॅन्सची काहीशी निराशा झाली. 


मात्र त्यांच्या आनंदात तसूभरही कमतरता आली नाही. त्यांनी शाहरुखच्या अनुपस्थितीतच केक कापून आपल्या लाडक्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.