रईस चित्रपटावरून शाहरूख अडचणीत, १०१ कोटीची मागणी
रईस या शाहरूखच्या आगामी चित्रपटासमोरील अडचणी वाढत आहेत, ज्या गँगस्टरच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा बनवला जात आहे, त्या गँगस्टरचा मुलगा अब्दुल लतीफच्या मुलाने अहमदाबादच्या एका कोर्टात याचिका दाखल केली आहे, यावरून शाहरूखला नोटीस पाठवण्यात आली आहे.
मुंबई : रईस या शाहरूखच्या आगामी चित्रपटासमोरील अडचणी वाढत आहेत, ज्या गँगस्टरच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा बनवला जात आहे, त्या गँगस्टरचा मुलगा अब्दुल लतीफच्या मुलाने अहमदाबादच्या एका कोर्टात याचिका दाखल केली आहे, यावरून शाहरूखला नोटीस पाठवण्यात आली आहे.
शाहरूखला कोर्टाच्या नोटीशीला ११ मे पर्यंत उत्तर देण्याची वेळ देण्यात आली आहे, आपल्या वडिलांना चित्रपटातून बदनाम केल्याचा दावा अब्दुल लतिफ यांनी केला आहे. यासाठी त्यांनी शाहरूख यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. यासाठी त्याने १०१ कोटी रूपयांची मागणी केली आहे.
गँगस्टर अब्दुल लतिफ यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे. या आधी आपण हा सिनेमा लतिफ यांच्या कुटुंबियांना दाखवला असल्याचं निर्मात्याने म्हटलं आहे.