मुंबई : 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारणारे आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुन धवन यांनी प्रेक्षकांची मन जिंकली होती. या सिनेमाला अनेकांनी पसंती दाखवली होती. लवकरच चाहत्यांना या सिनेमाचा सिक्वेल पाहायला मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची घोषणा करण जोहरने केली आहे. १९ ऑक्टोबर २०१२ रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने २०१२ मध्ये सर्वाधिक कमाई केली होती. 


ऋषी कपूर, सना सईद, रोनीत रॉय, राम कपूर आणि फरिदा जलाल यांनी ही या सिनेमामध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. 'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमाच्या  सिक्वेलची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन, यशराज फिल्मस आणि शाहरुख खानच्या रेड चिलीज यांच्या सहनिर्मितीने होणार आहे.