सलमान-अनुष्काच्या `सुल्तान`चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!
२०१६ मधील बहुचर्चित सुल्तानच ट्रेलर आता लवकरच लाँच होणार आहे. सुल्तानमध्ये सलमान खानसह अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
मुंबई : २०१६ मधील बहुचर्चित सुल्तानच ट्रेलर आता लवकरच लाँच होणार आहे. सुल्तानमध्ये सलमान खानसह अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
दिग्दर्शक अली अब्बास जफरने नुकतच ट्विटरवर सुल्तानचे ट्रेलर २४ मे रोजी लाँच करण्याचे जाहीर केले. या ट्विटमुळे सलमानच्या चाहत्यांमध्ये उत्साह आला आहे. सोशल मीडियावर ट्रेंडींगमध्ये आता #SULTANTrailerOn24thMay नंबर वन आले आहे. हरियाणा कुस्तीपटूवर आधारित सुल्तान चित्रपट येत्या ईदला प्रदर्शित होणार आहे.