मुंबई : जवळपास महिनाभराने कपिल शर्मा शोविषयी काही चांगली बातमी येतेय. माध्यमांमध्ये चालत असलेल्या बातम्यांनुसार, सुनिल ग्रोवर द कपिल शर्मा शोमध्ये परतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या एपिसोडचं शुटींग तो टीमसोबत करेल. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात या शूटचं शेड्युल्ड लागलं आहे.


स्वत: कपिल शर्मा , राजु श्रीवास्तव, सोनी चॅनल आणि इतर अनेकांनी केलेल्या मनधरणीनंतर सुनिल शोमध्ये सहभागी व्हायला तयार झालाय. तसंच तो त्याचं एप्रिलमध्ये संपणारं कॉन्ट्रक्ट रिन्यू करणार असल्याच्याही बातम्या आहेत.


काही सुत्रांकडून असे समजते की, चॅनलने सुनिलला मानधनात दुप्पट वाढ दिल्याने तो तयार झाला आहे. तर कोणी म्हणतं की सगळ्यांनी त्याची भरपूर समज घातल्याने तो तयार झाला आहे.


कारण काहीही असो. आता कपिल खुश असेल, सुनिल खुश असेल, चॅनल खुश असेल आणि त्यांचे चाहतेही खुश असतील. लवकरच आपल्याला आधीसारखा त्यांच्या पूर्ण टीमसोबतचा एपिसोड आपल्याला पाहायला मिळेल.