संजय कपूर तिसऱ्यांदा बोहल्यावर...
अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा एकेकाळचा पती आणि बिझनेसमन संजय कपूर तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकलाय.
नवी दिल्ली : अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा एकेकाळचा पती आणि बिझनेसमन संजय कपूर तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकलाय.
गेल्या पाच वर्षांपासून त्याची मैत्रिण आणि गर्लफेंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रिया सचदेव हिच्यासोबत संजयनं रजिस्टर्ड पद्धतीनं विवाह केलाय. न्यूयॉर्कमध्येही या लग्नाच्या निमित्तानं एक खास सोहळा आयोजित करण्यात आलाय.
प्रिया हिचा हा दुसरा विवाह आहे तर संजयचा हा तिसरा विवाह आहे. यापूर्वी प्रियानं अभिनेता-बिझनेसमन विक्रम चटवाल याच्यासोबत विवाह केला होता. संजय आणि करिश्मा यांचं नातंही कायदेशीररित्या २०१६ साली संपुष्टात आलं.
२०१४ पासून करिश्मा संजयचं दिल्लीचं घर सोडून मुंबईत स्थायिक झाली होती. संजय-करिश्मा यांना समायरा (१२ वर्ष) आणि कियान राज कपूर (७ वर्ष) असे दोन मुलं आहे. दोन्ही मुलांची कस्टडी कोर्टानं करिश्माकडे सोपवली आहे. संजयशी बिनसल्यानंतर करिश्माचंही संजय तोश्नीवाल याच्यासोबत नाव जोडलं जातंय.