मुंबई : सनी देओल त्याचा मुलगा करणला लवकरच बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. सनी देओल त्याच्या आगामी बेताब सिनेमाच्या सिक्वेलमध्ये करणला लाँच करणार आहे. 'बेताब' हा सिनेमा 1983 मध्ये रिलीज झाला होता. सनी देओलने याच सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमामध्ये सनी हा त्याच्या मुलासोबत सैफ अली खानची मुलगी साराला सोबत पाहू इच्छितो. सारा सैफची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी आहे. 'बेताब'मध्ये सनीसोबत अमृता सिंग लीड रोलमध्ये होती.


सनीने साराला 'बेताब अगेन'मध्ये घेण्यासाठी अमृता सिंगला फोन देखील केला होता. पण तिने त्यासाठी नाही म्हटलं आहे. अमृता सिंगची मुलगी साराने धर्मा प्रोडक्शनसोबत करार केल्याचं म्हटलं जातंय.