मुंबई : ज्या प्रकारे सलमान खान नेहमी चर्चेत बनलेला असतो तर त्याच्यावर वक्तव्य करणारे ही चर्चेचा विषय बनतात. सलमान खानच्या नावावर अनेकांनी प्रसिद्धी मिळवली आहे. कोणी त्याचं कौतूक करतं कोणी त्यांच्यावर टीका करतं. काही लोकं सलमानवर अप्रत्यक्षपणे टीका करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय बच्चनने देखील सलमानवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. ऐश्वर्यानंतर आता बॉलिवूडचा ढाई किलो का हाथ असणाऱ्या सनी देओलने देखील टोमणा मारला आहे. ‘घायल वन्स अगेन’च्या प्रमोशन दरम्यान सनीला जेव्हा विचारलं गेलं की, हा सिनेमा घायलचा सीक्वेल आहे का ? तर तो बोलला की, 'हा सिनेमा सीक्वल ही नाही आणि रीमेकही नाही.'


सनी देओलने म्हटलं की, ‘रीमेक सिनेमा बनवणं चांगला व्यवहार नाही. जे कॅरेक्टर एकदा फेमस होतात ते पुन्हा करणं म्हणजे मुर्खपणा असतो. सनी देओलचा इशारा हा सलमान खानकडेच असल्याचं दिसत होतं. सलमान खानने सगळ्यात जास्त रिमेक सिनेमे केले आहे. त्यामुळे सनी देओलने अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.