मुंबई : लाखो लोकांच्या हृद्यावर राज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑन आता असं काही करणार आहे की तरुणीही तिचे फॅन बनणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेलीव्हीजन रिअॅलिटी शो 'स्प्लिट्सविला' चा अजमान रणविजय सिंह म्हणतो की, या शोचा नववा सीजन हा पुरुषांना महिलांच्या प्रती वागणूक कशी असावी हे सांगणारा आहे.


रणविजयने 'स्प्लिट्सविला ९' च्या लॉन्चींगला म्हटलं की, नव्या सीजनची थीम 'वेअर वूमेन रूल' आहे आणि माझं आणि सनीचं असं मत आहे की आपल्या देशात या गोष्टींवर चर्चेची गरज आहे. मग ते कसंही सांगतलं जावे. हा शो पाहून अनेक जण स्वत:मध्ये बदल आणतील असं देखील त्याने म्हटलं आहे.


रणविजयने म्हटलं की, अनेक लोकांना हे माहित नसतं की महिलांसोबत कसं वागलं पाहिजे. त्यामुळे हे सांगितलं जाणार आहे. स्प्लिट्सविला ९' हा शो ११ जूनपासून सुरु होणार आहे.