मुंबई : पॉर्न स्टार, बिग बॉस ते बॉलीवुड असा प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओन लवकरच छोट्या पडद्यावरील मालिकेमध्ये दिसणार आहेत.  पॉर्न स्टार असल्यामुळे बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये सनी सदस्य म्हणून दाखल झाली.  त्यानंतर तिने ‘स्प्लिट्सव्हिला’हा शो होस्ट केला. आता  सनी चक्क टीव्ही मालिकेत दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 ‘अँड टीव्ही’वर गाजलेल्या ‘भाभीजी घर पे है’ या मालिकेत सनी दिसणार आहे. सोमवारपासून सनीने चित्रीकरणाला सुरुवात केली असून ती स्वतःच्याच भूमिकेत दिसणार आहे.


अंगुरी भाभी (शुभांगी अत्रे), अनिता (सौम्या टंडन), विभूती (आसिफ शेख) आणि मनमोहन (रोहिताश गौड) यांच्यासोबत सनी स्क्रीन शेअर करणार आहे. आपल्या सिनेमाच्या हिरोच्या शोधात सनी दिग्दर्शकासोबत येते, असं कथानक पाहायला मिळेल.


या मालिकेत सनी सही पकडे है हा डायलॉग म्हणणार आहे.