मुंबई : मुंबईच्या झोपडपट्टीतून थेट ऑस्कर सोहळ्याच्या मंचावर आपली छाप उमटवणारा बालकलाकार सनी पवार आज पहाटे मुंबईत परतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनीनं अभिनय केलेल्या 'लायन' या चित्रपटाला यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये नामांकन मिळालं होतं. या चित्रपटात सनीनं देव पटेलच्या बाल्यावस्थेची भूमिका केलीय.


सनी पवारनं ऑस्कर सोहळ्याच्या वेळी काही बालसुलभ खोड्या केल्याचं सर्वांनीच टिव्हीच्या पडद्यावर पाहिलं. त्यामुळे सर्वत्र त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली. 


आज पवार कुटुंबाच्या मित्र आणि नातेवाईकांनी विमातळावर गर्दी केली. 8 वर्षाचा सनी आणि त्याचं कुटुंब सांतक्रुझच्या कालीना परिसरात एका दोन खोल्यांच्या झोपडीवजा घरात राहतो.


इथे पाहा सनीच्या 'लायन' चित्रपटाचा ट्रेलर