मुंबई : सुपरस्टार रजनीकांत सध्या त्यांचा कबाली या सिनेमामुले चांगलेच चर्चेच आहेत. त्यांचे चाहते सिनेमाघरांच्या बाहेर मोठी लाईन लावून सिनेमा पाहत आहे. पण अनेकांना ही गोष्ट माहित नसेल की सुपरस्टार रजनीकांत देखील एका व्यक्तीचे मोठे फॅन आहेत. 75 वर्षाच्या कल्याण सुंदरम या व्यक्तीसमोर ते देखील आदराने झुकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण सुंदरम कोण आहेत यांच्या काही पोस्ट देखील काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर फिरत होती. कल्याणसुंदरम यांनी 30 वर्षांपर्यंत एक लायब्रेरियन म्हणून नोकरी केली. या दरम्यान मिळणारा पगार ते गरजुंना दान करत असत. त्यांच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी ते हॉटेलमध्ये काम करायचे. यासाठी त्यांना मॅन ऑफ द मिलेनियम अवॉर्डने देखील सन्मानित केलं गेलं आहे. त्यांना या पुरस्कारासोबत मिळालेले 30 कोटी देखील कल्याणसुंदरम यांनी गरजूंना दिलेत.


कल्याणसुंदरम यांच्या या कामांनी प्रभावित होऊन रजनीकांत यांनी त्यांना त्यांचे पिता म्हणून दत्तक घेतलं. 75 वर्षाचे कल्याणसुंदरम या वयात ही रोज ऑफिसमध्य़े जातात. यूएनओने त्यांना आउटस्टँडिंग पर्सन ऑफ 20th सेंच्युरी हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे. कल्याणसुंदरम यांनी लग्न देखील नाही केलं कारण यामुळे त्यांचा कौटुंबिक खर्च वाढला असता आणि त्यांना जास्तीत जास्त मदत करता आली नसती.