नवी दिल्ली : काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानच्या अडचणी पुन्हा वाढणार आहेत. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टच्या निर्णयाविरोधात राजस्थान सरकारची याचिका स्वीकारली आहे. सुप्रीम कोर्टात आता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. सलमान खानला नोटीस देखील पाठवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुराव्यांच्या अभावी जोधपूर हायकोर्टाने २५ जुलैला १८ वर्ष जुन्या काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला दोषमुक्त केलं होतं. त्यानंतर राजस्थान सरकारने सलमान खान विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. राजस्थान सरकारने हायकोर्टाच्या निर्णयाला दिलेल्या आव्हानाला सुप्रीम कोर्टाने स्वीकारलं आहे.


सलमान खानवर दोन काळवीटचा शिकार केल्याचा आरोप केला आहे. १९९८ मध्ये सलमान खान जोधपूरमध्ये 'हम साथ साथ है' सिनेमाच्या शूटिंग करत होता. त्या दरम्यान त्यांनी शिकार केल्याचा आरोप त्याच्यावर होता. सलमान खान या प्रकरणात तरुंगात देखील होता. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहणार आहे.