नवी दिल्ली : अभिनेत्री स्वरा भास्कर ही एअरपोर्टवर जबरदस्तीने चुकीच्या पद्धतीन छेडछाड झाल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. डीएनए या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तीने ही माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२९ वर्षीय अभिनेत्रीने या घटनेचा खुलासा करताना सांगितले की, प्रेम रतन धन पायो चित्रपटाच्या प्रमोशनवेळी राजकोटमध्ये तिची छेडछाड झाली होती. 


स्वरा म्हणाली, आम्ही जेव्हा प्रेम रतन धन पायोच्या प्रमोशनसाठी राजकोटमध्ये एअरपोर्टमध्ये उतरलो, त्यावेळी मला जबरदस्तीने स्पर्श करण्याचा प्रयत्न ककेला. त्यावेळी मी सलमानसोबत प्रवास करत होती. सलमान खानला पाहण्यासाठी एअरपोर्टवर २००० लोक आले होते. यावेळी आमच्यासाठी सुरक्षा होती. पण काही जणांनी असा प्रयत्न केला. अनुपम खेर यांनी मला सुरक्षीत कार जवळ नेले. हा शुद्ध वेडेपणा होता. 


गर्दीत मला खूप असुरक्षित वाटते. रांझणा चित्रपटावेळी आमच्यासोबत शुटिंगवेळी पाच जण सुरक्षेसाठी होते. 


जगातील कोणत्याही भागात विशेषतः भारतात महिला छेडछाडशिवाय मोठ्या होत नाही.