टप्पूची भूमिका साकारणार राज उनादकत
`तारक मेहता का उल्टा चष्मा`मध्ये टप्पूची भूमिकेला भव्य गांधीने अलविदा केल्यानंतर आता ही भूमिका अभिनेता राज उदानकत साकारणार आहे.
मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये टप्पूची भूमिकेला भव्य गांधीने अलविदा केल्यानंतर आता ही भूमिका अभिनेता राज उदानकत साकारणार आहे.
तब्बल 8 वर्षांपासून भव्य गांधी टप्पूची भूमिका साकारतोय. त्यामुळे टप्पू म्हणजे भव्य आणि भव्य म्हणजे टप्पू असे जणू समीकरणच बनले होते. भव्यने ही मालिका सोडल्यानंतर राज त्याची ही भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झालेय.
राजने याआधी 'एक रिश्ता साझेदारी' का या मालिकेत काम केले होते. त्यानंतर तो आता 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दिसणार आहे.
टप्पूचा बर्थडे साजरा केला जाणार आहे. या एपिसोडद्वारे नवा टप्पू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.