मुंबई :  सैराट सिनेमातील क्लास रूममधील तो सीन तुम्हाला आठवत असेल, ज्यात लंगड्या प्रदीप म्हणजेच तानाजी गळगुंडे हा आपले मार्क्स सरांना सांगत असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमात तानाजी म्हणतो, "माझं नाव प्रदीप बनसोड मला वाचायला आवडतं" (त्याला अख्खा वर्ग असतो, मुलीही) 


"खरंच आवडतं आई शप्पथ सर.... आणि बारावीला मला" (क्लास रूममध्ये मंग्या ओरडतो सर याने मार्क्स नाही सांगितले म्हटल्यावर प्रदीप म्हणतो) ३६ ...


सैराटमध्ये तानाजीला म्हणजेच प्रदीप बनसोडेला ३६ टक्के गुण बारावीत असल्याचं दाखवलंय.


पण प्रत्यक्षात तुम्हाला माहित नाही तानाजी गळगुंडे बारावीत काठावर पास व्हायला एवढाही 'ढ' नव्हता. तर बारावीत तानाजीला ७० टक्के गुण होते.


तानाजी बेंबळे गावातील विमलेश्वर विद्यालयात शिकला आहे. तानाजीला बारावीत ७० टक्के गुण होते. बारावीचं शिक्षण घेतल्यानंतर तानाजीने, त्याच्या गावापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या टेंभूर्णीच्या विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयात प्रवेश घेतला. बी.ए. च्या पहिल्या वर्षीची परीक्षा उत्तीर्ण करून तानाजी आता दुसऱ्या वर्षात पोहोचला आहे.