मुंबई : सब टीव्हीवरील 'तारक मेहता का उलट चष्मा' या लोकप्रिय हिंदी मालिकेने २ हजार एपिसोडचा टप्पा पार केला आहे.  गोकुळधाम सोसायटीला आजही या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२८ जुलै २००८ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारीत झाला त्यानंतर आज आठवर्ष ही मालिका आपला प्रेक्षक टिकवून आहे.


प्रेक्षकांना खळखळून हसवताना या मालिकेने नेहमीच आपले सामाजिक भान जपले आहे.अय्यर, सोढी, मेहता, भिडे, गडा ही कुटुंब प्रेक्षकांना आपल्यातलीच एक वाटतात. 


एखाद्या सिरियलने एक ठराविक एपिसोडचा टप्पा पार केल्यानंतर मालिकेचा वेग मंदावतो. प्रेक्षकांची रुची कमी होते. पण २ हजार एपिसोडचा टप्पा पार केल्यानंतरही प्रेक्षकांची या मालिकेतील रुची अजिबात कमी झालेली नाही. या मालिकेचे सुरुवातीला प्रसारीत करण्यात आलेले भाग आजही प्रेक्षकांना खिळवून ठेवतात, हे या मालिकेचे यश आहे. 


देशातील फक्त ही सर्वाधिक काळ चाललेली विनोदी मालिका नाही, तर सर्वाधिक एपिसोड पूर्ण करणारी मालिका आहे. आज आमच्या वाहिनीवर ही मालिका सुरु आहे ही अभिमानाची बाब आहे. हा एक सुखद प्रवास आहे,  असे सब टीव्हीचे बिझनेस हेड अनूज कपूर यांनी म्हटले आहे.