मुंबई : सब वाहिनीवरील प्रसिद्ध टीव्ही शो तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या सेटवर युनिटमधील सदस्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार, मालिकेचे हेड प्रॉडक्शन कंट्रोलर अरविंद मर्चंड यांचे सेटवर हृद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेटवर असताना अरविंद यांच्या छातीत दुखण्यास सुरुवात झाली तसेच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. अॅसिडीटीमुळे त्यांना त्रास होत असल्याचे वाटून त्यांना इनो पिण्यास देण्यात आला. 


मात्र अधिक त्रास जाणवू लागल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर तातडीने शूटिंग थांबवण्यात आलं.