मुंबई : मोबाईलवर सैराटची पायरेटेड कॉपी डाऊनलोड करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची असू शकते, सैराटची पायरेटड कॉपी डाऊनलोड करताना, अथवा ट्रान्सफऱ करताना, मोबाईलमध्ये व्हायरस आल्याचं काहींनी व्हॉटसअॅपवर लिहिलं आहे.


यामुळे अनेकांचा मोबाईल हँग होणं, अथवा डेटा डिलीट होणे, सॉफ्टवेअरच्या अडचणी येत असल्याचं सांगण्यात येत आहे. आयफोनला ही अडचण येत नसल्याचीही चर्चा आहे. सैराट सिनेमाची पायरेटेड कॉपी मोठ्या प्रमाणात मोबाईलवर फिरतेय, पण त्यासोबत 'तात्या व्हायरस'चाही मोबाईलमध्ये शिरकाव होत असल्याची चर्चा आहे.