मुंबई : अभिनेता सलमान खानच्या 'तेरे नाम' या चित्रपटातील अभिनेत्री भूमिका चावला तुम्हाला आठवतेय का? २००३मध्ये तेरे नाम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटातून भूमिकाला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. मात्र या चित्रपटानंतर भूमिका रुपेरी पडद्यावरुन गायब होती. २००३नंतर आता पुन्हा एकदा भूमिका चित्रपटात पुनरागमन करतेय. लव्ह यू आलिया या चित्रपटात ती दिसणार आहे. 


या चित्रपटातील भूमिकेबाबत बोलताना भूमिका म्हणाली, लव्ह यू आलियामधील भूमिका यापूर्वी केली नाही. हा चित्रपट समाजासाठी चांगला मेसेज असेल. ज्याप्रमाणे माझी भूमिका रेखाटण्यात आलीये त्यामुळे मी आनंदी आहे. या चित्रपटाबाबत खूप उत्सुक आहे. हा चित्रपट लोकांना आवडेल असा मला विश्वास आ