नवी दिल्ली : 'दिग्दर्शकाने सांगितल्यानंच कटप्पानं बाहुबलीला मारलं' असं गंमतीदार उत्तर तमिळ अभिनेता सत्यराज यांनी एका मुलाखती दरम्यान दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बाहुबली' या ब्लॉकबस्टर चित्रपटात कटप्पाची भूमिका करणाऱ्या या अभिनेत्याने सांगितलं की ,'गेली दोन वर्ष मला सर्वांनी हाच प्रश्न विचारून विचारून छळलंय... पण, मला माहित असूनही मी कुणालाच याचं खरं कारण सांगू शकत नव्हतो... दिग्दर्शकांनी मला तशी ताकीदच दिली होती. मी माझ्या कुटुंबियांनाही हे कधीच सांगितलं नाही. मात्र आता बाहुबली : द कन्क्लुजन या सिनेमात तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल'.


'२०१५ ला आलेल्या या चित्रपटाने सर्वांनाच प्रश्नात पाडलं. आजपर्यंत इतका ध्येयवेडा दिग्दर्शक मी कधीच पाहिला नाही. तसंच एखाद्या चित्रपटाविषयी लोकांचा इतका वेडेपणा पाहिला नाही. हा चित्रपट इंडस्ट्रीतला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे' असंही सत्यराज यांनी म्हटलंय. 


या चित्रपटाने २०१५ ला जगभरात ६०० करोडांची कमाई केली. २८ एप्रिलला याचा दुसरा भाग चित्रपटगृहात आपल्या भेटीला येईल. चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे.