मुंबई : ए आर रेहमान यांनी नव्वदीच्या काळात संगीतबद्ध केलेल्या एका सुपरहीट गाण्याला रिमिक्सचा तडका लागलाय. सोशल मीडियावर या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोबतच चर्चा सुरू आहे ती आदित्य - श्रद्धाच्या डान्सची... श्रद्धाच्या हॉटनेसची आणि बोल्डनेसची... शु्क्रवारी सायंकाळी ४ वाजता या गाण्याला 'ओके जानू' चित्रपटाच्या टीमनं सोशल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आलं. 


१९९५ साली आलेल्या मणीरत्नम दिग्दर्शित 'बॉम्बे' या सिनेमात पहिल्यांदा 'हम्मा हम्मा' हे गाणं पाहायला मिळालं होतं... आता मात्र, संगतीकार तनिष्क बाग्ची आणि बादशाह यांनी रॅपची फोडणी देऊन हेच गाणं पुन्हा एकदा सादर केलंय.