मुंबई : मोगली अजूनही लोकप्रिय आहे, कारण 'द जंगल बुक'ची ४ दिवसांत ४८ कोटींची कमाई झाली आहे. जंगल जंगल पता चला हैं, चड्डी पहन के फूल खिला हैं' हे ऐकून अनेकांच्या बालपणीच्या आठवणी जागे झाल्या, तर अनेकांचं बालपणात या गाण्याने नव्याने रंग भरण्यास सुरूवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉलीवूड चित्रपट 'द जंगल बुक'ने ४ दिवसांत तब्बल ४८ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाच्या यशामुळे मोगली हे पात्र अजूनही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असल्याचं दिसत आहे. 


मुंबईत जन्मलेल्या रुडयार्ड किपलिंग यांचा जंगल बुक हा जंगलकथांचा संग्रह १२० वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला होता.


यावर्षी रिलीज झालेल्या सर्वच चित्रपटांना 'द जंगल बुक'ने मागे सारलं आहे. 'नीरजा', 'कपूर ऍण्ड सन्स', 'वझीर' आणि 'कि ऍण्ड का' या चित्रपटांवर मोगली भारी पडला आहे.