मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित सिनेमाचं फिव्हर अजूनही कमी होतांना दिसत नाही आहे.  सैराटने सिनेप्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे. आजही सैराट सिनेमाचे कलाकारांना पाहण्यासाठी लोकं मोठी गर्दी करत आहेत. सैराटचं यश इतकं मोठं होतं की आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्याची दखल घेतली गेली. सैराटची टीम पहिल्यांदाच हिंदी शोमध्ये झळकले आणि त्यामुळे हिंदी शोजला ही तुफान प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील एक मोठा हिंदी कॉमेडी शओ 'द कपिल शर्मा शो'मध्ये ही सैराटच्या टीमला आमंत्रित करण्यात आलं होतं. कपिल शर्माचा सैराटच्या टीमसोबतचा हा शो इतक्या लोकांनी पाहिला की द कपिल शर्मा शो टीआरपीमध्ये पहिल्या नंबरवर जाऊन पोहोचला. कपिल शर्माचा हा शो युट्युबवर ही टॉप ट्रेंडिंगमध्ये होता.


प्रथमच एका मराठी सिनेमाचं एका मोठ्या हिंदी शोमध्ये प्रमोशन झालं होतं पण कपिल शर्मा शोचा फायदा सिनेमांना व्हायचा पण सैराटने हे समीकरण बदललं कारण सैराटमुळे कपिल शर्माचा शो पहिल्या स्थानावर जावून पोहोचला. सैराटमुळे अनेक चॅनल्सचा देखील टीआरपी वाढल्याचं दिसून आलं.