मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिनं घेतलेला घटस्फोटाचा निर्णय अत्यंत खाजगी असला तरी त्याबाबत अनेक चर्चांणा उधाण आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौंदर्या घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत का येऊन थडकली असेल? याबद्दल अनेक तर्क वितर्क लढवले जाऊ लागलेत. परंतु, सौंदर्या आणि तिचा नवरा अश्विन रामकुमार यांनी हा निर्णय का घेतला? हा सर्वस्वी त्यांचा खाजगी निर्णय आहे.


तरीही एका वेबसाईटच्या म्हणण्यानुसार, सौंदर्या आणि अश्विन यांच्यात 'नात्यांतला आणि भावनिक दुरावा' निर्णाण झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय. जवळपास चार वर्ष एकमेकांना 'डेट' केलं... केवळ एवढ्याच कारणासाठी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. परंतु, ते दोघे कधीही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले नव्हते, असं या वेबसाईटनं म्हटलंय. 


सौदर्या आणि तिचा पती अश्विन यांनी सहमतीनं कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केलाय. सौंदर्या ही रजनीकांत याची लहान मुलगी आहे. २०१० मध्ये तिचा अश्विन रामकुमार यांच्याशी विवाह झाला होता. या जोडप्याला एक मुलगाही आहे.