चेन्नई : रजनी फॅन्सचं आपल्या 'सुपरस्टार'वर असलेल्या प्रेमाचं आणखी एक उदाहरण समोर आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईच्या एका रेस्टॉरन्टमध्ये सुपरस्टार रजनीकांतची मूर्ती साकारण्यात आलीय. या मूर्तीची खासियत म्हणजे ही मूर्ती पूर्णपणे चॉकलेटनं बनवण्यात आलीय.


ही मूर्ती तब्बल सहा फूट उंच आहे. रजनीकांतची ही मूर्ती बनवण्यासाठी ६०० किलो चॉकलेटचा वापर करण्यात आलाय. 
 
दरम्यान, आज राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार वितरण सोहळा रंगला. यावेळी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिनेते रजनीकांत यांचा पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करून गौरव केलाय.