मुंबई : जेट एअरवेजच्या विमानात केबिन क्रूच्या विनंतीनंतर सोनू निगमनं गाणं गायलं... आणि हा प्रकार या विमानातील क्रू मेम्बर्सना भलताच महागात पडला. यानंतर सोनूनं आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यावेळी विमानात कार्यरत असलेल्या पाच एअरहोस्टेसना निलंबित करण्यात आलंय. हे माहीत पडल्यानंतर सोनूनं जेट एअरवेजच्या या निर्णयावर 'हिच तर खरी असहिष्णुता' असं म्हणत ताशेरे ओढलेत.


'मला गाणं गाण्यास सांगणाऱ्या क्रू मेम्बर्सना निलंबित करणं धक्कादायक आहे. ज्यावेळी मी गाणं गात होतो तेव्हा सीट बेल्ट साईन्स बंद झाल्या होत्या आणि इतर कोणतीही अनाऊन्समेन्ट होणार नव्हती. ही कारवाई म्हणजे आनंद पसरविण्यासाठी दिली जाणारी शिक्षा आहे' असं सोनूनं म्हटलंय. 


'परदेशांत विमानांतून प्रवास करताना पायलट आणि क्रू मेम्बर्सही पॅसेंजरना आनंद देण्यासाठी जोक्स करताना मी पाहिलंय... ही कारवाई म्हणजे मूर्खपणा आहे आणि हीच खरी असहिष्णुता आहे' असंही सोनूनं म्हटलंय.


 


४ जानेवारी रोजी एका कार्यक्रमाहून जोधपूरहून मुंबईला परतताना गायक सोनू निगमनं विमानात गाणं गायलं होतं. गाण्याचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर जेट एअरवेजनं पाच एअरहोस्टेसना निलंबित केलंय.