मुंबई :  सलमान खान आणि रणबीर कपूर नेहमी एकमेकांपासून अंतर ठेवूनच वावरत असतात. पण अनंत अंबानी यांचा वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सलमान आणि रणबीर कपूर एकाच छताखाली दिसले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खान आणि रणबीर कपूर हे एकत्र दिसत नाही याला इतिहास आहे. रणबीर चित्रपटात येण्यापूर्वी दोघांमध्ये वाद होते. एका रेस्टॉरंटमध्ये दोघांमध्ये वाद झाले होते. 


कतरिनामुळे दोघांमध्ये अधिक भडका


अभिनेत्री कतरिना कैफ सुरूवातीला सलमानसोबत डेटिंग करत होती. पण नंतर तीने सलमानला डम करून रणबीरशी सूत जुळवलं. त्यानंतर दोघे एकमेकांच्या वाटेला गेले नाही. 


पुरस्कार सोहळा असो वा इतर ठिकाणी दोघे एकाचवेळी कधीच दिसले नाही. पण आता दोघांची गरज एका छताखाली 
होती हे दिसून आले. 


मुकेश अंबानीचा मुलगा अनंत अंबानीच्या बर्थ डे पार्टीला दोघे एकत्र दिसले होते. अंटिला येथे झालेल्या या पार्टीत सलमान खान १.३० मिनिटांनी आला. त्यानंतर एक तासांनी रणबीर आला. 


दोघे एकाचवेळी एकाच ठिकाणी होते. त्यामुळे दोघांनी एकमेकांशी गप्पा मारल्या असतील का ? तर नाही त्या दोघांनी एकमेकांशी संभाषण केले नाही. 


दोघे इतरांशी खूप आस्थेने भेट होते. रणबीरने एक कोपरा पकड़ला होता आणि आपल्या ग्रुपसोबत तो बोलत होता. तर सलमाननेही रणबीरपासून लांब राहणेचं पसंत केले. 


रणबीर आणि करिना यांच्यात आता ब्रेकअप झाला असून त्याने कतरिनाला फसवल्याचे म्हटले जाते आहे. त्यामुळे सलमान त्याला माफ करणार नाही, असाच सलमानचा स्वभाव आहे.