मुंबई : तुमच्या आयुष्यातले काही क्षण कधीही न विसरता येण्याजोगे... त्यातही ते आयुष्यभराची सोबत करू शकेल अशा व्यक्तीबद्दल असतील तर ते जवळजवळ अशक्यच... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवटचा शब्द, शेवटची भेट आणि आपल्या प्रेमाला दिलेला कायमचा (कदाचित) निरोप... प्रेम, विरह आणि पुन्हा एकदा भेटणं... हाच धागा घेऊन आलेत अभिनेते नसरुद्दीन शाह, शेरनाज पटेल, श्वेता प्रसाद आणि नवीन कस्तुरिया..... 


१३ मिनिटांची 'इंटिरिअर कॅफे नाईट' ही शॉर्टफिल्म तुम्ही स्तब्ध होऊन पाहात राहाल... अधिराज बोस यानं याचं दिग्दर्शन केलंय. या शॉर्ट फिल्मनं आत्तापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकलेत.