मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत न भूतो न भविष्यती असे यश मिळवले. या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैराटसिनेमासोबत त्यातील प्रत्येक पात्र, सिनेमातील ठिकाणे, संवाद अद्यापही चाहत्यांच्या लक्षात आहे. याच सिनेमातील एका गाण्याचे थोडेसे शूटिंग वाळलेल्या झाडावर कऱण्यात आले होते. या झाडाची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. ही फांदी तुटल्याने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जातेय. 


सैराट सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर या झाडाजवळही सेल्फी काढण्याचे प्रमाण वाढले होते. लोकांनी आर्ची ज्या फांदीवर बसली होती त्या फांदीवर बसून सेल्फी काढले होते. ही फांदी तुटल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगतेय.