मुंबई : संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त जेव्हा आठ वर्षांची होती तेव्हा संजयची पहिली पत्नी रिचा शर्माचं निधन झालं. तिला ब्रेन ट्यूमर होता. रिचाची मुलगी त्रिशाला हिने काही दिवसांपूर्वीच आपल्या आईचे पत्र इन्स्टाग्रामवर शेअर केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२१ वर्षांपूर्वी रिचाने लिहिलेले हे पत्र होते. त्रिशाला स्वत:ही चांगल लिहिते. मात्र याचं श्रेय ती तिच्या आईला देते. हे पत्र शेअर करताना तीही भावुक झाली होती. 


१९८७मध्ये संजय आणि रिचाने लग्न केलं. १९८८मध्ये रिचा आणि संजयला त्रिशालाच्या रुपाने कन्यारत्नाचा लाभ झाला. मात्र त्यांचे हे सुख जास्त काळ टिकू शकलं नाही. १९९६मध्ये रिचाचा ब्रेन ट्यूमरने मृत्यू झाला. त्यानंतर १९९८मध्ये दत्तने रिहा पिल्लई हिच्याशी विवाह केला. मात्र २००५मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. अखेर २००८मध्ये संजयने मान्यता हिच्याशी तिसरा विवाह केला.