मुंबई : साधाभोळा राणादा-अंजली बाईंच्या प्रेमकथेवर आधारित 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेय. त्यामुळेच मालिकेचा टीआरपीही झपाट्याने वाढतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण कऱणाऱ्या या मालिकेने मालिकाविश्वात नवा विक्रमच प्रस्थापित केलाय. या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची पसंती मिळतेय. त्यातच राणादा आणि अंजलीबाईंच्या लग्नाच्या एपिसोडलाही मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग लाभला.


त्यांच्या लग्नाचे सर्व विधी रितसर प्रत्येक एपिसोडमधून दाखवण्यात आले. २७ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान हळदीपासून ते मेहंदीपर्यंतच्या सर्व सोहळ्यांचे भाग दाखवण्यात आले होते. तसेच लग्नाचा विशेष दोन तासांचा भाग दाखवण्यात आला होता. महाराष्ट्रातील तब्बल १४.२ कोटी प्रेक्षकांनी हा लग्नाचा दोन तासांचा विशेष भाग पाहिला. 


मालिकेतील या विशेष भागांसाठी फेसबुक तसेच इतर सोशल मीडियातूनही मोठ्या प्रमाणात प्रोमोशन करण्यात आले होते. त्यासोबत हळदी समारंभासाठी आणि लग्नाच्या वरातीसाठी दोन नवी गाणी बनवण्यात आली होती. या गाण्यालाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला.