मुंबई : सेक्सोहॉलिक या शॉर्ट फिल्ममध्ये दिलेल्या बोल्ड सीनमुळे शमा सिंकदर काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. पण आता पुन्हा एकदा शमा सिकंदर चर्चेत आली आहे ते तिने केलेल्या एका वक्तव्या बाबत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदर काही सिरीअल्समध्ये झळकली होती. तिने त्यामध्ये खूपच साधे आणि चांगले रोल केले होते. पण काही दिवस मध्ये गायब असणारी शमा सिकंदरने जेव्हा पुन्हा एन्ट्री मारली तर पुन्हा ती चर्चेत आली आहे.


शमा सिकंदर ही मानसिक रुग्ण होती. असा खुलासा तिने स्वत: केला आहे. काही दिवसांपूर्वी मला काय झालं आहे हे मला कळत नव्हत. डॉक्टरकडे जातांना ही मी म्हणायची मला काय झालंय ? एक वर्ष मला काय होत आहे हे मला काहीच कळत नव्हतं. 


मी अचानक मध्येच रात्री उठून बसायची. काय झालं कोणालाच काही कळत नव्हतं. पण ज्यांना माझ्या या आजाराबाबत माहित होतं ते मला सांभाळून घ्यायचे.