मुंबई : प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य यांचं ट्विटर हँडल 'ट्विटर'नं रद्द केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिजीतनं स्वाती चतुर्वेदी नावाच्या एका पत्रकाराविषयी अपमानजनक ट्विट्सची मालिकाच प्रसिद्ध केली होती. त्या विरोधात चतुर्वेदी यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे गेल्या वर्षी अभिजीत यांना अटक करुन जामिनावर सोडण्यात आलं होतं.


या प्रकारानंतर अभिजीत यांनी पुन्हा एकदा जेएनयूच्या विद्यार्थीनी शाहेला रशिद यांच्याविरोधात अपमानकारक ट्वीटची मालिका प्रसिद्ध केली. त्यानंतर ट्वीटर हँडलवर कारवाई करण्यात आलीय. 


महिलांबद्दल अश्लील ट्विट केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. सोशल मीडियाच्या यूजर्शनं ५८ वर्षीय गायकाविरुद्ध अपमानजनक आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्याची तक्रार नोंदवल्यानंतर मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरनं ही कारवाई केलीय.