`सलमानने मारलं नाही, काळवीटने आत्महत्या केली होती`
अभिनेता सलमान खान काळवीट शिकार प्रकरणी निर्दोष असल्याचा निर्वाळा राजस्थान हायकोर्टाने दिला आहे. हा खटला १८ वर्ष खटला होता.
मुंबई : अभिनेता सलमान खान काळवीट शिकार प्रकरणी निर्दोष असल्याचा निर्वाळा राजस्थान हायकोर्टाने दिला आहे. हा खटला १८ वर्ष खटला होता.
सलमानला निर्दोष असल्याचा कोर्टाचा निर्णय आल्यानंतर ट्विटराईड्स चांगेलच भडकले आहेत. काळवीटाची शिकार सलमानने नाही केली, तर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती का? असा सवाल विचारला जात आहे.
काळवीट शिकार प्रकरणी निर्दोष ठरल्यानंतर सलमान प्रत्येक वादातून बाहेर कसा येतो, याचा अनुभव चाहत्यांना पुन्हा एकदा आला आहे.
सलमान निर्दोष ठरण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मुंबईतील हीट अँड रन प्रकरणातही मुंबई हायकोर्टाने सलमानची निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला आहे.
सलमानने काही दिवसांपूर्वीच सुलतानच्या शुटींगनंतर बलात्कार पीडितेसारखं वाटत होतं, असं सहज बोलून नवा वाद ओढून घेतला होता. या प्रकरणातही सलमानला महिला आयोगाने नोटीस दिली. मात्र नंतर पुढील कारवाई दिसून आली नाही.