मुंबई : कपिल शर्माला नेहमी देशातील लोकांनी डोक्यावर घेतलं आहे. कपिल शर्माचा शो हा लोकांना खूप आवडतो. पण हेच लोकं कपिल शर्माच्या विरोधाच जातांना दिसत आहे. कपिल शर्माने एक ट्विट केलं आणि पुन्हा एकदा चर्चेत आला. सगळ्या शासकीय यंत्रणा कामाला लागल्या, मुख्यमंत्र्यांनी देखील त्याची दखल घेतली पण आता हेच ट्विट त्याच्यावर भारी पडतांना दिसत आहे. कपिल शर्माच्या विरोधात FIR दाखल झाली आहे. अवैध बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने त्याला नोटीस बजावली आहे. कपिल शर्मावरचे आरोप जर खरे ठरले तर त्याला 3 वर्षाती शिक्षा देखील होऊ शकते. सोशल मीडियावर देखील त्याच्या विरोधात लोकं बोलू लागले आहे. पण अशा वेळेस खान कुटुंबिय कपिलसोबत उभे राहिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खानचे दोन्ही भाऊ अरबाज आणि सोहेल खान कपिल शर्माच्या सपोर्टसाठी उतरले आहेत. काल झालेल्या एका कार्यक्रमात अरबाज़ खानने नाराजी दर्शवली. त्याने म्हटलं की, 'या देशात राजकारणाविषयी प्रत्येकाचा विचार वेगळा आहे आणि त्यांना माहित आहे की विचार व्यक्त केल्यास त्यांची काय शिक्षा मिळेल. जर कपिलने काही चुकीचं म्हटलं असेल तर त्याला त्याचा सामना करावा लागेल. कोही काही बोललं की त्याचा दुसरा अर्थ काढला जातो. म्हणतात की, आपल्याला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण जेव्हा बोलतो तर हल्ले सुरु होतात. आपल्याला मत व्यक्त करु देण्यास दिलं पाहिजे. तुम्ही त्याच्या मताशी सहमत नसाल तरी त्याला त्याच्या वक्तव्यासोबत सोडून दिलं पाहिजे. भ्रष्टाचाराविरोधात त्याच्यासोबत उभे राहण्याऐवजी आपण त्यालाच वाईट म्हणतो.'


अरबाजसोबत सोहेल खानने देखील कपिलला सपोर्ट करत म्हटलं की, 'प्रत्येकाकडे स्वत:चा एक वेगळा अनुभव आहे. मी कपिलला खूप दिवसांपासून ओळखतो. तो खूप चांगला व्यक्ती आहे. पण आता यामुळे दोघं खान बंधु अडचणीत तर येणार नाहीत ना ? याची चर्चा सुरु झाली आहे.