नवी दिल्ली : संगीत दिग्दर्शक अनू मलिक यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनू मलिक यांची पत्नी अंजू अनू मलिक हिनं एक फोटो शेअर करून ही माहिती दिलीय. या फोटोत अनू मलिक यांच्या बाजुला त्यांची आई आणि बहिणही दिसत आहे. 


अंजू यांनी शेअर केलेला फोटो

'माझ्या पतीचा आधारस्तंभ... लव्ह यू मम्मी आणि छोटी मम्मी' असं कॅप्शन या फोटोल अंजू यांनी दिलंय.  


55 वर्षीय अनू मलिक यांनी बॉलिवूडला 350 हून अधिक गाणे दिलेत. 1977 मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये म्युझिक कंपोझर म्हणून पहिलं पाऊल टाकलं होतं. यश राज फिल्मच्या 'दम लगा के हैशा' या सिनेमाला संगीत देऊन त्यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं होतं.