मुंबई : दिलीप कुमारचा 'राम और श्याम', देवआनंदचा 'हम दोनो', शाहरूख खानचा 'डुप्लिकेट' यांसारखे जुळ्याची भूमिका साकारणारे अनेक सिनेमे हिट झाले आहेत. तशीच जुडवामधली सलमान खानची भूमिकाही तितकीच गाजली.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘जुडवा’ मध्ये सलमानसोबत करिश्मा आणि रंभा यांची जोडी होती. त्यांची करिष्मासोबतचे ‘टन टना टन टन टन तारा’ तर रंभासोबतचे ‘ईस्ट ऑर वेस्ट इंडिया इज द बेस्ट' ही गाणी फेमस झालेली.

जुडवाचे दिग्दर्शन केलले डेव्हिड धवन लवकरच जुडवाचा सिक्वल घेऊन येत आहेत. जुडवा २ मध्ये सलमानची भूमिका करणार आहे वरूण धवन तर करिश्मा आणि रंभाची भूमिका करणारेत आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर.

वरूण धवन पहिल्यांदाच डबल रोल करणार आहे. तर आलिया आणि श्रद्धा या पहिल्यांदाच एकत्र काम करणारेत. ऑफ स्क्रीन आमचा बाँड एकदम स्पेशल आहे अस सांगणाऱ्या आलिया आणि श्रद्धाची ऑन स्क्रीन केमिस्ट्रि कशी रंगणार हेच बघावं लागणार आहे.