नवी दिल्ली : बॉलिवूडच्या जोडगोळ्या आमिर खान-किरण राव यांचा मुलगा आझाद आणि ऐश्वर्या-अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या या दोन चिमुरड्यांना शाळेत एकत्र नाचण्याची संधी मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थातच, आराध्या-आझाद यांचा हा डान्स धीरुभाई इंटरनॅशनल स्कूलच्या या कार्यक्रमातला सर्वात चर्चेतला भाग ठरला. 


शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात इतर काही चिमुरड्यांसह आराध्या-आझाद यांनीही सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम पाहण्यासाठी या दोन्ही चिमुरड्यांचे पालकही शाळेत दाखल झाले होते.


आमिर-ऐश्वर्या-अभिषेक हेदेखील आपल्या मुलांना चिअरअप करत त्यांना प्रोत्साहन दिसले.