रणवीर, सलमान पाठोपाठ करणकडूनही ‘रूस्तम’चं प्रमोशन
बी-टाऊनमध्ये सध्या ज्याची जोरदार चर्चा आहे त्या रूस्तम सिनेमाचं तितकंच जोरदार प्रमोशन ट्विटरवरही सुरू आहे. दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यात “रूस्तम 8 डेज टू गो” असं म्हणत करण सिनेमाचं प्रमोशन करत आहे.
मुंबई : बी-टाऊनमध्ये सध्या ज्याची जोरदार चर्चा आहे त्या रूस्तम सिनेमाचं तितकंच जोरदार प्रमोशन ट्विटरवरही सुरू आहे. दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यात “रूस्तम 8 डेज टू गो” असं म्हणत करण सिनेमाचं प्रमोशन करत आहे.
काहीच दिवसांपूर्वी सलमान खाननेही रूस्तमचं प्रमोशन करणारा एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. त्यात सिनेमागृहात जाऊन रूस्तम पाहण्याचं आवाहन सलमानने चाहत्यांना केलं होतं.
रणवीर सिंग, सोनाक्षी सिन्हा इत्यादी कलाकारांकडूनही अक्षयचं चांगलंच कौतुक होत आहे. रणवीर सिंगने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये रणवीर नेव्हीचा गणवेश घालून नाचताना दिसत आहे. रूस्तममध्ये अक्षयने नौदल अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.