न्यूयॉर्क : अभिनेता आणि डेरा सच्चा सौदाचे बाबा राम रहीम गुरमीत सिंह यांची मस्करी केली म्हणून नुकतंच किकू शारदा याला तुरुंगात जावं लागलं होतं, हे आठवत असेलच तुम्हाला? आता हॉलिवूडचा प्रसिद्ध अमेरिकन कॉमेडियन, अॅक्टर आणि टेलिव्हिजन होस्ट जिमी फॅलॉन याच्यासोबतही असंच होणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिमी फॅलॉन यानं आपल्या एका कार्यक्रमात गुरुमीत सिंह आणि त्याचा सिनेमा 'मॅसेंजर ऑफ गॉड'च्या 'लव्ह चार्जर' या गाण्याची टर उडवलीय. जिमीचा कार्यक्रम 'द टुनाइट शो' 29 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. 


आता जिमीनं बाबा राम रहीम गुरमीतची अशी टर उडवलेली त्याच्या अनुयायांना भावणार का? आणि नाही तर पुढे काय? असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय.