मुंबई : महेश मांजरेकर दिग्दर्शित 'एफयू' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सैराट' फेम आकाश ठोसरचा ट्रेन्डी लूक या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपलासा वाटेल असा हा सिनेमा असल्याचा दावा केला जातोय. 


मित्रांसोबत घातलेला राडा, पहिलं प्रेम, लेक्चर्स बंक करण्यातली मजा, व्यवस्थेविरुद्ध जाण्याची बंडखोर वृत्ती, नव्याने मिळालेले स्वातंत्र्य आपल्याला हव्या तशा पद्धतीने उपभोगायची उर्मी, नवनवे अनुभव घेण्याची उत्सुकता यासंबंधित सगळ्या कॉलेजच्या आठवणी असा सगळा थाट 'एफयू' सिनेमाच्या या ट्रेलरमध्ये दिसतोय... 


आकाश ठोसरसोबतच या चित्रपटात सत्या मांजरेकर, वैदेही परशुरामी, संस्कृती बालगुडे अशा तरुण कलाकारांसोबतच बोमन इराणी, सचिन खेडेकर, आनंद इंगळे ईशा कोप्पीकर, शरद पोंक्षे, काश्मीरा शहा यांच्याही भूमिका पाहायला मिळणार आहेत.  हा सिनेमा २ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.