COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : 'झी मराठी'वरील चला हवा येऊ द्या च्या महाराष्ट्र दौऱ्याचा हा भाग रंगणार आहे बारामतीमध्ये... मधल्या काही काळात महाराष्ट्र दौऱ्याला अल्पविराम देण्यात आला होता. परंतु आता थुकरटवाडीतील ही सर्व मंडळी सज्ज झाली आहे सर्व प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी.


येत्या सोमवारी आणि मंगळवारी प्रसारित होणाऱ्या या भागामध्ये झी नाट्य गौरवसाठी नामांकन प्राप्त केलेले कलाकार सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये दिग्दर्शक अभिनेते संजय मोने, अभिनेत्री स्वाती चिटणीस, कादंबरी कदम, ऋजुता देशमुख, गिरीजा ओक, संपदा जोगळेकर, कला दिग्दर्शक प्रदीप मु्ळ्ये, प्रकाश योजनाकार शितल तळपदे यांचा समावेश आहे. या कलाकारांसोबत थुकरटवाडीतील मंडळीनी धमाल उडवून दिली. 


विशेष म्हणजे या कलाकारांसोबत रंगलेला ‘बारामती विरूद्ध करामती’ हा आगळा वेगळा सामनाही बघायला मिळणार आहे. याशिवाय शांताबाईची धम्मालही प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.