मुंबई : 'नकुशी'... मुलींचं ओझं वाटणाऱ्या आईवडिलांना नको झालेल्या अनेक 'नकुशी' महाराष्ट्रात आढळल्या... हाच संवेदनशील आणि तितकाच गंभीर विषय घेऊन एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टार प्रवाह या वाहिनीवर 'नकुशी' ही मालिका लवकरच दिसणार आहे. शहरी वातावरणाची चौकट मोडून खेड्यापाड्यांतील 'नकुशीं'च्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून होताना दिसतोय.   


या मालिकेचं टायटल साँग नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय... गायक महेश काळे यांच्या आवाजातलं आणि संगीतबद्ध केलेलं हे सुरेल गाणं सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतंय.