COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : 'सैराट' हा सिनेमा इतका लोकप्रिय होईल, असा अंदाज क्वचितच कुणी बांधला असावा... खुद्द नागराजलाही कदाचित हा अंदाज आला नसेल... आत्तापर्यंत या सिनेमानं ५५ कोटींचा गल्ला जमवलाय. 


या सिनेमाचा प्लस पॉईंट म्हणजे या सिनेमाचं संगित, बॅकग्राऊंड म्युझिक आणि... या सिनेमातली गाणी... त्यातही 'याडं लागलं गं' हे गाणं भलतच लोकप्रिय झालंय... या गाण्याचे शब्दही रांगडी भाषेतील असले तरी तितकेच याड लावणारे आहेत...
 
याडं लागलं ग याडं लागलं गं
रंगलं तुझ्यातं याडं लागलं गं
वास ह्यो उसात येई कस्तूरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं
चांद भासतो दिसाच मावळाया लागलं
आस लागली मनात कालवाया लागलं गं


याडं लागलं ग याडं लागलं गं…
रंगलं तुझ्यातं याडं लागलं गं
वास ह्यो उसात येई कस्तूरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं


सांगवना बोलवणा मन झुरतया दुरून
पळतया टळतया वळतया माग फिरून
सजल गा धजल गा लाज काजल सारल
येंधल हे गोंधळल लाड लाड गेल हरून
भाळल अस उरात पालवाया लागलं
ओढ लागली मनात चालवाया लागलं
याडं लागलं ग याडं लागलं गं…


सुलगना उलगना जाळ आतल्या आतला
दुखन हे देखन ग ऐकलंच हाय साथीला
काजळीला उजाळल पाझळुन ह्या वातीला
चांदणीला आवताण धाडतोय रोज रातीला
झोप लागणं सपान जागवाया लागलं
पाखरू कस आभाळ पांघराया लावतोया