मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित चित्रपट 'सैराट' आता कन्नडमध्येही येतोय, हे एव्हाना तुम्हाला समजलंच असेल... त्यासाठी तुम्ही उत्सुकही असाल... पण, कन्नड सिनेमातल्या 'झिंगाट' गाण्यानं ही प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कन्नडमध्ये 'सैराट'च्या रिमेकचं शूटींग पूर्ण झालंय. नुकतंच या सिनेमातल्या 'झिंगाट' गाण्याचं कन्नड व्हर्जन जाहीर करण्यात आलंय. 



कन्नड सिनेमातही अभिनेत्री रिंकू राजगुरूच मुख्य भूमिकेत दिसणार आहे तर मुख्य अभिनेता म्हणून सत्यप्रकाश यांचा मुलगा निशांत दिसणार आहे. कन्नडमध्ये या सिनेमाचं नाव असेल 'मनसु मल्लिगे'!