मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचा नवरा सिद्धार्थ रॉय कपूर तिच्यावर नाराज झाल्याचा चर्चा आहेत. काहीच दिवसांपूर्वी ऋतिक आणि कंगनामधल्या वादावर विद्या बालननं प्रतिक्रिया दिली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वादामध्ये कंगना स्वत:साठी उभी राहिली, याबद्दल मी तिचा सन्मान करते, असं विद्या म्हणाली होती. विद्या बालनचा नवरा सिद्धार्थ रॉय कपूर हा यूटीव्ही डिज्नी स्टुडियोचा प्रमुख आहे, आणि यूटीव्ही डिजनी ऋतिकचा आगामी चित्रपट काबिलची निर्माता आहे. त्यामुळे विद्याचा नवरा नाराज झाल्याचं बोललं जात आहे. 


विद्या बालननं मात्र या सगळ्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. तुम्ही म्हणत असाल तर आमच्यामध्ये भांडण नक्कीच झालं असेल, पण मला याबाबत काहीच माहिती नाही, अशी प्रतिक्रिया विद्यानं दिली आहे.