विक्रम गोखलेंनी घेतली निवृत्ती
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रंगभूमीवरुन निवृत्त व्हायचा निर्णय घेतला आहे.
पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रंगभूमीवरुन निवृत्त व्हायचा निर्णय घेतला आहे. पण सीरियल्स आणि चित्रपटांमध्ये मात्र ते काम करणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून विक्रम गोखलेंना घशाचा त्रास होत आहे, त्यांच्यावर उपचारही सुरु आहेत. पण या त्रासामुळे त्यांना रंगभूमीवर काम करायला मर्यादा येत असल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी रंगमंचावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.