कन्नड सैराटमध्ये विकी साकारणार परश्याची भूमिका
मराठी चित्रपटसृष्टीत विक्रमांचे इमले रचणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा चित्रपट आता कन्नड, तामिळ, तेलुगु आणि मल्याळम या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. कन्नड भाषेत सैराटची निर्मिती रॉकलाईन व्यंकटेश प्रॉडक्शन हाऊस करत आहे.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत विक्रमांचे इमले रचणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा चित्रपट आता कन्नड, तामिळ, तेलुगु आणि मल्याळम या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. कन्नड भाषेत सैराटची निर्मिती रॉकलाईन व्यंकटेश प्रॉडक्शन हाऊस करत आहे.
कन्नड भाषेतील सैराटच्या रिमेकमध्ये परश्याची भूमिका कोण साकारणार याबाबत निश्चिती झाल्याचे समजतेय. कन्नडचे प्रसिद्ध कलाकार व्ही. रविचंद्रन यांचा मुलगा विक्रम रविचंद्रन परश्याची भूमिका साकारणार आहे.
२२ वर्षांचा विक्रम रविचंद्रन आता रुपेरी पडद्यावर हिरो होण्यासाठी सज्ज झालाय. याआधी त्याने वडिलांच्या चित्रपटात छोटेखानी भूमिका केली होती. दरम्यान, सैराटचा तेलुगुमधील रिमेक नागराज मंजुळे दिग्दर्शित करणार आहेत.