लाहोर : पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकनं पती असद बशीर खान खट्टकशी घटस्फोट घेतला आहे. वीणा मलिकला चित्रपटांमध्ये परत यायचं होतं, पण वीणानं दोन्ही मुलांचा सांभाळ करावा असं असदला वाटत होतं. या मुद्द्यावरून दोघांमध्ये खटके उडत होते. हे भांडण विकोपाला गेल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून वीणा वेगळी राहत होती. अखेर लाहोरमधल्या न्यायालयामध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला.


२०१३मध्ये वीणा आणि असदनं दुबईमध्ये लग्न केलं होतं. वीणा मलिक पाकिस्तानी अभिनेत्री असली तरी भारतामध्येही ती प्रसिद्ध आहे. बिग बॉस या रिअॅलिटी शो च्या चौथ्या सिझनमध्ये वीणा सहभागी झाली होती.